मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी, राज्यातील हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार? लवकरच घोषणा

मोठी बातमी, राज्यातील हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार? लवकरच घोषणा

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)  पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण, काही जिल्ह्यात अजूनही निर्बंध कायम आहे. राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची (Hotels and restaurants) वेळ 10 वाजेपर्यंत वाढवण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting)  चर्चा झाली आहे. लवकरच याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी शालेय फी सवलत देण्याच्या मुद्दावर आज पुन्हा कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली. तसंच, याबद्दल अध्यादेश काढत यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.

तर दुसरीकडे, मुंबई आणि पुण्यात हॉटेल आणि रेस्टॅारंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आता हा निर्णय राज्यात लागू करावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता  राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची वेळ 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

तसंच  मॉल्स 50 टक्के आसन क्षमतेनं सुरू करण्यात यावे, अशी चर्चा सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.  बहुतेक मंत्र्यांनी याबाबत मॉल्स, हॉटेल्स सुरू करावे असं मत मांडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईतील निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टाँरंट, मॉल आणि दुकानं यांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स (Task Force)आणि रेस्टाँरंट (restaurants) मालक संघटनांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आज कॅबिनेटमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होणार आहे. पुढील 1 किंवा 2 दिवसात SOP जाहीर होईल, असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

पुढे अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन टप्या टप्याने शिथिल करणं योग्य ठरेल. जी परिस्थिती आता केरळमध्ये आली आहे. ती आपल्याडे येऊ नये यासाठी आपल्याला जपून पाऊल उचलावं लागेल.

परत कोरोना वाढता कामा नये, असंही ते म्हणालेत. त्यामुळे मॉल आणि रेस्टाँरंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दोन लस पूर्ण केल्यास त्यांनाही काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

First published: