मुंबई 20 मे: चार लॉकडाऊनच्या अंमलबाजवणीनंतर आता रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
येत्या १ जून पासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी जाहीर केला होता. दररोज २०० नॉन एसी गाड्या पहिल्या टप्प्यात धावणार आहेत. त्यामुळे रेल्वेने स्टेशनवरची दुकानेही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्व व्यवहार ठप्प होता. लोकांच्या हाताला काम नव्हतं. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पण दुकाने सुरू करतानाच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्या. कुणाही ग्राहकाला दुकानात बसून वाढण्याची व्यवस्था करू नका असंही रेल्वे मंत्रालयाने सुचवलं आहे. १ जून पासून सुरू होणाऱ्या गाड्यांचं बुकिंगही लवकरच सुरू केलं जाणार आहे.
Lockdown : गुजरातमधून मृतदेह आणला पण राज्याच्या सीमेवरच केले अंत्यसंस्कार
दरम्यान रेल्वे नंतर आता विमानसेवेही सुरू करण्यात येत असल्याचं आज जाहीर करण्यात आलं. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी बुधवारी अशी माहिती दिली आहे की, देशामध्ये 25 मे म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे की सोमवारपासून देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू केले जाईल.
मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ
यासंदर्भात सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना उड्डाणासाठी आणि इतर व्यवस्थांसाठी तयार राहण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मंत्रालयाकडू एसओपी देखील जारी करण्यात येणार आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी बुकिंग देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येईल मात्र त्याबाबत अद्याप कोणतीह अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.