ठाण्यातील रुग्णालयांनी कोरोना रूग्णांकडून 1.85 कोटी अधिक आकारले; आता पालिकेने दिला दणका  

ठाण्यातील रुग्णालयांनी कोरोना रूग्णांकडून 1.85 कोटी अधिक आकारले; आता पालिकेने दिला दणका   

अनेक ठिकाणी रुग्णालये लाखो रुपये आकारत आहेत, आता पालिकेच्या दणक्यानंतर रुग्णालयांना पैसे परत करावे लागणार आहेत

  • Share this:

ठाणे, 24 ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक कोरोना सारख्या महासाथीत अनेक खासगी रुग्णालयांनी दुकानदारी करीत रुग्णांची लुटमार सुरू केली आहे. अशात राज्यातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यात कमीत कमी 17 खासगी रुग्णालयांनी कोविड-19 (covid 19) रुग्णांकडून अधिक 1.82 कोटी रुपये वसूल केले आहेत.

यामध्ये अद्यापही 1.40 कोटी रुपये परत करणे बाकी आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. रुग्णालयांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. बिपिन शर्म यांनी शहरातील 17 रुग्णालयांच्या बिलांची तपासणी केली. यानंतर लेखा परीक्षकांची एक टीम गठीत केली. संस्थेने जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, टीमने केलेल्या तपासात 10 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत बिलांची तपासणी केली आणि 1362 बिलांमध्ये एकूण 1.82 कोटी रुपये अधिकार आकारल्याचे दिसून आले.

हे वाचा-73 दिवसात Corona Vaccine मिळण्याचा दावा खोटा! पुण्यातून आली मोठी बातमी

ठाणे महानगर पालिकेने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ज्यानंतर रुग्णालयाने 26.68 लाख रुपये रुग्णांना परत केले. पालिकेचं म्हणणं आहे की 15.27 लाख रुपयांच्या अधिक किमतीसाठी रुग्णालयांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मात्र त्यांना अद्यापही 1.40 कोटी रुपये परत करणे बाकी आहे. गेल्या महिन्यात संस्थेने घोडबंदर रोडवरील स्थित एका खासगी रुग्णालयाद्वारे अधिक शुल्क आकारल्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला होता. या  रुग्णालयाला कोविड - 19 केंद्राच्या सूचनेतून हटविण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या