महामार्गावर बर्नींग कारचा थरार, होंडा सिटी कार जळून खाक

महामार्गावर बर्नींग कारचा थरार, होंडा सिटी कार जळून खाक

या घटनेमुळे काही काळ रस्त्यातली वाहतूकही खोळंबली होती. नंतर जळालेली कार बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं.

  • Share this:

विजय देसाई, मुंबई 18 डिसेंबर : अहमदाबाद महामार्गावर वसई नजीक मालजीपाडा येथे बुधवारी संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास एका होंडा सिटी कारने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर खळबळ उडाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर झालेल्या या अपघातात होंडा सिटी कार मात्र जळून खाक झाली. यातला चालक सुदैवाने वाचलाय. कांदिवली येथील निलेश पटीयाल हे आपल्या होंडा सिटी कारने महामार्गावरून मुंबई वाहिनीवरून जात होते.रात्री 8:30 च्या दरम्यान वसई मालजीपाडा येथे त्यांच्या गाडीतून धुर येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधानाने रस्त्याच्या कडेला कार थांबवून ते बाहेर पडले.मात्र काही कळण्याच्या आत कारने अचानक पेट घेतला.यावेळी महामार्गावर एकच खळबळ उडाली.

काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला याबाबत कळविण्यात आले. मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे काही काळ रस्त्यातली वाहतूकही खोळंबली होती. नंतर जळालेली कार बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 10:19 PM IST

ताज्या बातम्या