INSIDE STORY: गृहमंत्र्यांची खुर्ची आणि शरद पवार अजितदादांची 'ती' बैठक!

INSIDE STORY: गृहमंत्र्यांची खुर्ची आणि शरद पवार अजितदादांची 'ती' बैठक!

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना केवळ प्रशासन आणि महाआघाडीच्या घटक पक्षांना नव्हे तर राष्ट्रवादीच्या रुसवा फुगवे यांचाही सामना करावा लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल: राज्याचे नवे गृहमंत्री (Home Minister) म्हणून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पदभार स्वीकारला आहे. पहिल्या पंगतीतले नेते आणि अनेकदा संधी हुकलेल्या वळसे पाटील यांना अखेर हे पद मिळालं. परंतु, राष्ट्रवादीमध्ये (NCP) असलेल्या सत्तेच्या स्पर्धात इथे पर्यंत पोहचणे सहज शक्य नाही हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या रुसवा फुगवे यांचाही सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्रिपदाचा निर्णय होण्याआधी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांची (Ajit Pawar) खास बैठक झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस मधली सत्तास्पर्धा जाणून घ्यायची असेल तर 1990 ला जावं लागेल. याच काळात अजित पवार, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, आर.आर.पाटील, जयंत पाटील, गणेश नाईक, मधुकर पिचड, विजय कुमार गावित, अनिल देशमुख बबनराव पाचपुते  यांच्या सारखे दिग्गज राष्ट्रवादीचे तरुण चेहरे उदयाला आले. त्यात छगन भुजबळ या अनुभवी नेत्यांची जोड लाभली. राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार आलं. याच काळात राष्ट्रवादीच्या तरुण चेहऱ्यांनी युती सरकारला सळो की पळो करून ठेवलं होतं. या तरुण चेहऱ्यांना जी झळाळी मिळाली ती आज अखेरपर्यंत कायम आहे.

कतरिना कैफही कोरोना पॉझिटिव्ह; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम

किंबहुना त्यात डावपेचांची धार अनुभवी आणि तीव्र झाली आहे. युती सरकार सत्तेतून पाय उतार झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर आली. सत्तेत विलासराव देशमुख असले तर सत्तेततील मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच राहीला. आपसूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाची धुरा या यंग ब्रिगेडच्या हाती सोपवली. पहिल्या पाच वर्षे सेना भाजप यांच्याशी एकसंघ मुकाबला करणारी राष्ट्रवादी 1999 नंतर विशेषतः 2004 मध्ये पक्षातील प्रतिस्पर्धी सोबत संघर्षात गुंतली.

अजित पवार विरुद्ध भुजबळ, भुजबळ विरुद्ध आर आर पाटील, दिलीप वळसे विरुद्ध दादा, दादा विरुद्ध जयंत पाटील, हा अंतर्गत संघर्ष उघड होऊ लागला. प्रत्येकाने आपला सवता शुभा उभा केला. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या चार महत्वाचा पदांसाठी कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली. म्हणूनच की काय 2004 मध्ये सर्वाधिक जागा येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपद ऐवजी अधिकची मंत्रिमंडळ मागून घेतली.

लग्नाच्या दिवशीच लोचा झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा

त्या मागचं कारणही राष्ट्रवादीमधील मुख्यमंत्रिपदासाठी सत्ता स्पर्धाच मानलं जातं. ही सत्तास्पर्धा पक्षप्रमुख साठी डोकेदुखी असली तरी हीच सत्ता स्पर्धा एकमेकांवर अंकुश ठेवण्यासाठी देखील महत्वाची ठरली. वरचढ ठरणाऱ्याचे डिमोशन आणि त्याचा प्रतिस्पर्धी मुख्यपदावर हे सत्ता समतोल राष्ट्रवादीमध्ये सतत सुरू आहे. ज्याचा मोठा गट त्यानं सत्तेची गणित जुळवून घेतलं, त्याच बरोबर ओबीसी, मराठा , धनगर, आदिवासी, अशा समाजातल्या सर्व वर्गांना राष्ट्रवादी ने नेतृत्व दिलं, नुसतं दिलंच नाही तर त्यांना त्या समाजात अग्रस्थानी नेऊन ठेवलं. पुढे हेच वजन या नेत्यांनी पक्षात विविध पद मिळवण्यासाठी वापरलं.

पण अजित पवारांनी आमदारांचा सर्वात मोठा गट आपल्याजवळ ठेवला. तेच राजकीय हत्यार म्हणून वापरले, दोन वेळा दिलेला राजीनामा, आणि एकदा भाजप बरोबर सकाळचा शपथविधी हा याच संख्याबळ च्या दाबावाच राजकारण होत हे स्पष्ट आहे.  गृहमंत्रिपदाची इच्छा असलेल्या अजित पवार यांनी या पदावर पाणी सोडले खरं पण त्या बदल्यातया मंत्रिमंडळात देखील धनंजय मुंडे, दत्ता भरर्णे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, या समर्थकांना महत्वाची खाती देण्यासाठी अजित पवार यांनी स्वतःचं वजन वापरलं.

क्षणार्धात ज्वाळांनी लपेटला कारखाना! भिवंडीतल्या भीषण आगीचे PHOTOS

छगन भुजबळ यांच्यानंतर जे गृहमंत्रिपदावर आलेत ते गृहमंत्री या पदावर येताना एक दोघांना वागल्यास तो सर्व गट तटामध्ये मान्य होईल का? याची काळजी राष्ट्रवादीने कायम घेतली आहे. म्हणून काय आर.आर.पाटील यांच्याकडे सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि पिचड यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद ठेवण्यात आलं. पण या पदासाठी कायम लॉबिंग दावेदारी होत राहिली.  सूत्रांच्या माहितीनुसार, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद देताना अजित पवार आणि दिलीप वळसे यांची एकत्र बैठक शरद पवारांनी घेतली होती. त्याचबरोबर अजित पवार यांना दिलीप वळसे यांच्याकडील उत्पादन शुल्क खाते अधिकच देण्यात आलं. दिलीप वळसे पाटील यांना केवळ प्रशासन आणि महाआघाडीच्या घटक पक्षांना नव्हे तर राष्ट्रवादीच्या रुसवा फुगवे यांचाही सामना करावा लागणार आहे.

Published by: sachin Salve
First published: April 6, 2021, 6:49 PM IST

ताज्या बातम्या