Home /News /mumbai /

महापौर पेडणेकरांना धमकी पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, पोलिसांना दिले थेट आदेश

महापौर पेडणेकरांना धमकी पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, पोलिसांना दिले थेट आदेश

 महापौरांना अश्लाघ्य भाषेत धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन केले जाईल'

महापौरांना अश्लाघ्य भाषेत धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन केले जाईल'

महापौरांना अश्लाघ्य भाषेत धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन केले जाईल'

    मुंबई, 10 डिसेंबर : मुंबईच्या महापौर किशोरीताई  पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar)  यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र लिहिण्यात आले होते. या प्रकरणाची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil ) यांनी दखल घेतली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहे. वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. त्यानंतर आता महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र समोर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खुद्ध गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. 'मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून त्यांना व कुटुंबीयांना कडेकोट पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौरांना अश्लाघ्य भाषेत धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन केले जाईल' अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी दिली. लस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral दरम्यान, किशोरी  पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र हे विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलाने पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या धमकी पत्राबद्दल मुंबई पोलिसांनी उरणमधून जाऊन चौकशी केली. पण त्या पत्यावर अशी कोणतीही व्यक्ती राहत नसल्याचे समोर आले आहे. पेडणेकर यांच्या कुटुंबीयांना संपवण्याची भाषा दरम्यान,या धमकी पत्रामध्ये अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरण्यात आली आहे. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकु विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकु तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली, हे अत्यंत किळसवाणं होतं, असं सांगताना महापौर किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या