नक्की कोणाची चौकशी होणार? फडणवीसांच्या टीकेनंतर गृहमंत्र्यांनी ट्वीट करत दिली माहिती

नक्की कोणाची चौकशी होणार? फडणवीसांच्या टीकेनंतर गृहमंत्र्यांनी ट्वीट करत दिली माहिती

सेलेब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशीवरून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न केला

  • Share this:

मुंबई, 8 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह अन्य सेलेब्रिटींनी काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर केलेलं ट्वीट केंद्र सरकारच्या दबावामुळे तर केलं नाही ना, याबाबत आता राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या मुद्द्यावरून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता याबाबत अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे,' असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

सचिन सावंत यांनीही घेतली सावध भूमिका

'भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलेब्रिटींची नाही. उलट सेलेब्रिटींना भाजपपासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत,' असा पलटवार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा - सचिनसह सेलेब्रिटींच्या चौकशीवरून ठाकरे सरकारवर भडकले देवेंद्र फडणवीस

'काही सेलेब्रेटींवर भाजपा दबाव आणून ट्वीट करावयास भाग पाडू शकतो. काही सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये Amicable हा शब्द समान आहे. सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचे ट्वीट एकाच शब्दात आहेत. सुनील शेट्टीने आपल्या ट्विटरला भाजपा पदाधिकारी हितेश जैन याला टॅग केलं आहे. यातून भाजपा कनेक्शन दिसते. अनेक जणांनी याअगोदर राजकीय ट्वीट कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना दबाव आणून भाग पाडले जात आहे का? याची चौकशी आम्ही मागितली आहे. आमच्या विरोधात ही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आले पाहिजे. पण जर भाजपा ची भीती असेल तर ती दूर झाली पाहिजे,' असंही सचिन सावंत म्हणाले.

Published by: Akshay Shitole
First published: February 8, 2021, 8:05 PM IST

ताज्या बातम्या