महाराष्ट्र पोलीस दलातला भावुक क्षण, अनिल देशमुखही अधिकाऱ्याच्या पोस्टमुळे गहिवरले

महाराष्ट्र पोलीस दलातला भावुक क्षण, अनिल देशमुखही अधिकाऱ्याच्या पोस्टमुळे गहिवरले

'एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. अमोल कुलकर्णी जेव्हा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पहिले आजारी होते तेव्हा त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक इमेज पहायला मिळाली ती अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेली'

  • Share this:

मुंबई, 17 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दल आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य पार पाडत आहे. परंतु, कर्तृव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख गहिवरले असून त्यांनी एक भावूक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

मुंबईतील धारावी इथं कर्तृव्य बजावत असताना शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अमोल कुलकर्णी  जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी "कोणी 5 कोटी दिले तर कोणी 500 कोटी दिले, आम्ही मात्र आमचं आयुष्य देतोय." अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमोल कुलकर्णी यांची ही पोस्ट 'आज अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेली' अशी भावना व्यक्त केली.

हेही वाचा -पुण्यात ज्याची भीती होती तेच झालं, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नवं संकट

अनिल देशमुख आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की,'कोरोना विषाणूशी लढत असताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं. या वीर योध्याला धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अमोल कुलकर्णी यांच्या आठवणी सांगताना एरवी कर्तव्याच्या बाबतीत कातळापेक्षाही कठोर असलेले त्यांचे सर्व सहकारीही कसे भावूक झाले होते, हे मी पाहिलं.

या सहकाऱ्यांना धीर देत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी आणि राज्य सरकार खंबीरपणे उभं आहोत, याची ग्वाही दिली. मान्य आहे, की आज प्रसंग कठीण आहे. आज सगळे पोलीस कशा परिस्थितीत काम करत आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण विश्वास ठेवा, हेही दिवस लवकरच जातील. एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. अमोल कुलकर्णी जेव्हा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पहिले आजारी होते तेव्हा त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक इमेज पहायला मिळाली ती अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेली.

"कोणी 5 कोटी दिले तर कोणी 500 कोटी दिले, आम्ही मात्र आमचं आयुष्य देतोय." असं वाक्य त्यावर लिहिलेलं होतं. दुर्दैवाने त्या पोस्ट मधील हा मजकूर अमोल कुलकर्णी यांच्याबाबतीत तंतोतंत खरा ठरावा, हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल. काही का असेना पण हे सत्य पचायला खूप जड जातंय. यानिमित्ताने मी सर्व पोलिसांना आश्वस्त करतो की तुमचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याची किंमत ही पैशात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या. काम करताना कशाचीही गरज पडली तर ती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोचवण्यास विसरू नका...'

"रक्षिण्या देशार्थ,

केलास जन्म सार्थ.

वीर जवान शोभलास,

जावो न बलिदान व्यर्थ"

गृहमंत्री अनिल देशमुखांसमोर पोलीस निरीक्षकाला कोसळलं रडू

दरम्यान, शाहूनगर पोलीस अमोल कुलकर्णी यांच्या निधनानंतर पोलीस दलात चिंतेचं वातावरण होतं. या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली आणि तिथल्या पोलिसांना धीर देत मनोबल वाढवलं. त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सहकाऱ्याच्या निधानानंतर पोलीस निरीक्षकाला अश्रू अनावर झाल्यानं गृहमंत्र्यांसमोर रडू कोसळलं.

अनिल देखमुख यांनी पोलीस निरीक्षकाचं सांत्वन केलं. अचानक भावनांची लाट उसळल्यानं अश्रू अनावर झाले आणि रडू कोसळल्यानं शांतता पसरली. गृहमंत्र्यांनी धीर देत शाहूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांचं मनोबल वाढवलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 17, 2020, 12:07 PM IST

ताज्या बातम्या