Home /News /mumbai /

कडक सॅल्युट! गृहमंत्री म्हणाले, 'आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो'

कडक सॅल्युट! गृहमंत्री म्हणाले, 'आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो'

"आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे", अशा शब्दांत आकाश गायकवाड यांना फोन करून विशेष गृहमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.

    मुंबई 4 जून: मुंबई पोलिस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी बुधवारी ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला रक्त देऊन माणुसकीचे नाते जपलं. या कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. "आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे", अशा शब्दांत आकाश गायकवाड यांना फोन करून विशेष गृहमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात बुधवारी 14 वर्षांच्या सना फातिम खान या छोट्या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. यावेळी तिला A+ रक्त लागणार होते. हेही वाचा -त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाहीत, अशा गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे ऑन ड्युटी पोलिस हवालदार आकाश बाबासाहेब गायकवाड यांनी रक्तदान करून चिमुरडीला जीवदान दिलं. माणुसकी हाच आपला धर्म समजून व पोलिस ब्रीदवाक्य सद्रक्षणाय यास अनुसरून तिच्यासाठी अशा संकटप्रसंगी धावून आले. रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले. कोणत्याही संकटसमयी पोलिस हे देवदूत बनून मदतीला येतात. हे यातून पुन्हा सिद्ध झाले. कोरोना संसर्ग असो की निसर्ग चक्रीवादळ. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलिस दलाचा कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! या संपूर्ण पोलिस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलिस दलाचा अभिमान आहे. शब्दात गृहमंत्र्यांनी आकाशचा गौरव केला आहे. हेही वाचा -पोलिसांसमोरच दोघे भिडले, एकमेकांवर केले कोयत्याने सपासप वार

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या