Home /News /mumbai /

गंगापूर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीने भारावले गृहमंत्री, तोंडभरून केले कौतुक

गंगापूर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीने भारावले गृहमंत्री, तोंडभरून केले कौतुक

रस्त्यावरून जात असताना एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा असह्य झाल्या होत्या. नेमकं त्याचवेळी गस्तीवर (Gangapur Police) असलेल्या पोलीस कर्मचारी देवाप्रमाणे धाव घेऊन आले.

    मुंबई, 05 जानेवारी : भल्या पहाटे रस्त्यावरून जात असताना एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा असह्य झाल्या होत्या. नेमकं त्याचवेळी गस्तीवर (Gangapur Police) असलेल्या पोलीस कर्मचारी देवाप्रमाणे धाव घेऊन आले आणि महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil Deshmukh) यांनी कौतुक केले आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूरमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या भारती उत्तम जाधव (वय 23) या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. परंतु, पहाटेच्या वेळी दवाखान्यात नेण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हते. त्यामुळे आपल्या नातेवाईकांसह भारती जाधव या रस्त्याने पायी रुग्णालयाकडे निघाल्या. पण, वाटेतच पोटात दुखू लागल्यामुळे त्यांनी रस्त्यावर मदतीसाठी आक्रोश केला. याच दरम्यान, गंगापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे गस्तीवर होते. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार,  हवालदार उगले, गिरीश महाले, सोळसे हे पोलिसांची व्हॅन घेऊन आले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून गर्भवती महिला भारती जाधव यांना  तातडीने रुग्णालयात हलवले.
    ग्रामीण आरोग्य केंद्रात नेल्यानंतर तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेची प्रसूती केली असता तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पोलिसांनी वेळीच गर्भवती महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केल्यामुळे सुखरूप प्रसुती झाली. गंगापूर पोलिसांनी माणुसकी दाखवल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. 108MP कॅमेरासह Xiaomi Mi 10i भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा गंगापूर पोलिसांची पाठ थोपटली आहे. 'नाशिक पोलीस दलातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी पहाटे ३ वाजता गस्तीच्या वाहनातून ज्येष्ठ दाम्पत्यासोबत असणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंगापूर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे' अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी गंगापूर पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या