मुंबईत अखेर उद्यापासून सुरू होणार दारूची होम डिलिव्हरी; दुकानं राहणार बंदच
मुंबईत अखेर उद्यापासून सुरू होणार दारूची होम डिलिव्हरी; दुकानं राहणार बंदच
प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र दारूची होम डिलिव्हरी सुरू होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने दारूची दुकानं मात्र बंदच राहतील, असं आदेशात म्हटलं आहे.
मुंबई, 22 मे : मुंबईत दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार उद्यापासून म्हणजे शनिवारपासून घरपोच सेवा देण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे. पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने दारूची दुकानं मात्र बंदच राहतील, असं आदेशात म्हटलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र दारू मिळणार नाही, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य शासनाने LOCKDOWN 4.0 मध्ये दिलेल्या परवानग्यांमध्ये अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कंटन्मेंट झोन वगळता अन्यत्र दारूची घरपोच विक्री करता येईल. ऑनलाईन दारूविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. दुकानं मात्र बंदच राहतील. राज्य शासनाने दारूविक्रीला परवानगी दिल्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. मुंबईकरांचीसुद्धा दारूसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला होता. त्यामुळे लगेचच हा निर्णयम मागे घेत दारूची दुकानं मुंबईत बंद झाली होती.
सरकारने सोडलेल्या 200 विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबणार, पण...
आताही दारूची दुकानं, काउंटरवरून मिळणाऱ्या दारूसाठी बंदच राहतील, पण ऑर्डर नोंदवून घरी मागवता येईल, असं या आदेशावरून स्पष्ट आहे.
आता लॉकडाऊनचे नियम राज्यभरात शिथिल झालेले असले, तरी मुंबईत वाढणारा कोरोनाव्हायरचा संसर्ग पाहता, मुंबईत अजूनही सार्वजनिक वाहतूक सुरू झालेली नाही. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं बंदच आहेत. पुणे, मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला नाही.
आर्थिक संकटाने घेतला बळी; मुंबईहून सायकलवर घरी परतलेल्या मजुराची आत्महत्या
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे जीव वाचल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. लॉकडाऊन नसता तर देशातील परिस्थिती भयावह झाली असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. जर लॉकडाऊन लागू केला नसता तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 36 ते 70 लाखांपर्यंत पोहोचली असती. मात्र लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक घरात थांबले होते. त्यामुळे या आजाराचा फैलाव रोखण्यात आला. लॉकडाऊनमुळे 78183 मृत्यू रोखण्यात आले आहे. तर 23 लाख केसेस रोखण्यात आले आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टेटिस्टिक्स एन्ड प्रोग्राम इम्पलीमेंटेशन संस्थेने अंदाज लावला आहे की लॉकडाऊनमुळे 20 लाखांपर्यंतचे केसेस रोखण्यात आले आहे. याशिवाय 54000 मृत्यू रोखण्यात आले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.