मुंबई, 17 जुलै : मुंबई विमानतळावर (Mumbai airport) एका निनावी फोनमुळे (hoax call) मोठी खळबळ उडाली आहे. एका खासगी विमानात आरडी एक्स स्फोटकं ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आला आहे. या फोनमुळे विमानतळावर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केला असून शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर दुबईहून (dubai) आलेल्या एका खासगी विमानात स्फोटकं असल्याचा निनावी फोन दुपारी 4 वाजेच्या सुमारास आला. हे एक खासगी विमान (private plane) असून दुपारीच मुंबईत विमातळावर उतरले आहे. त्यानंतर 4 वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने फोन करून दुबईहून आलेल्या विमानात RDx सारखी स्फोटकं ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
त्यामुळे विमातळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी या फोन कॉल कुठून आणि कुणी केला याची माहिती गोळा करत आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहे.
काही दिवसांपूर्वी सुद्धा मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कॉल आला होता. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा तो निनावी कॉल नागपूर येथून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील उमरखेडमधून एका 43 वर्षीय इसमाला अटक केली होती. या व्यक्तीचं नाव सागर मांडरे (Sagar Mandare) असे असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.