नवी मुंबईत हिट अ‍ॅण्ड रन; फुटपाथवरील तिघांना उडवले...

नवी मुंबईत हिट अ‍ॅण्ड रन; फुटपाथवरील तिघांना उडवले...

नवी मुंबईतील सीवूड्स येथे एका भरधाव कारने फुटपाथ जवळ उभ्या असलेल्या तिघांना उडवले.

  • Share this:

नवी मुंबई, 04 जून: नवी मुंबईतील सीवूड्स येथे एका भरधाव कारने फुटपाथ जवळ उभ्या असलेल्या तिघांना उडवले. या घटनेत आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर नात जखमी झाली आहे. ललिता पाटील आणि अमोल पाटील अशी मृतांची नावे आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत अशा प्रकारे झालेला हा दुसरा अपघात आहे. मुंबईतील महालक्ष्मी परिसरात सोमवारी (3 जून) दोन भरधाव कारच्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सीवूड येथील या घटनेत फुटपाथवर असलेल्या तिघांना उडवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कारचा चालक आमीर मोहम्मद इस्माईल अन्सारी याला अटक केली आहे.

अपघातात जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भरधाव कारनं चिरडल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू

दोन भरधाव कारच्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील महालक्ष्मी परिसरात सोमवारी (3 जून) रात्री ही दुर्घटना घडली. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील ताबा सुटल्यानं मर्सिडीज कार (E350) दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या BMWवर जोरदार धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या के.के. मार्गावरील हा अपघात आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस कोर्सच्या गेट क्रमांक 1 जवळील ही दुर्घटना घडली. दुसऱ्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मर्सिडीज कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट फूटपाथवरच शिरली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राजेंद्र प्रसाद राम असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात राजेंद्र गंभीर जखमी जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

VIDEO : पेट्रोल पंपावर तरुणीची हायहोल्टेज ड्रामा, सांगितलं स्वत:ला आमदाराची गर्लफ्रेंड!

First published: June 4, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading