मुंबईतील सर्वात मोठं गूढ उकलण्यासाठी ATSचा 'स्पेशल प्लॅन', तब्बल 10 टीम लागल्या कामाला!

मुंबईतील सर्वात मोठं गूढ उकलण्यासाठी ATSचा 'स्पेशल प्लॅन', तब्बल 10 टीम लागल्या कामाला!

Hiren Mansukh Death Case : हिरेन मनसुख यांची पत्नी आणि मुलगा यांनी दहशतवादी विरोधी पथक (ATS) पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

  • Share this:

मुंबई, 7 मार्च : 'माझ्या पतीचा अपघाती मृत्यू झालेला नाही.त्यांचा पाण्यात बुडून जीव गेला नाही, कारण त्यांच्या चेहऱ्यावर गडद लाल रंगाच्या खुणा आहेत. त्यामुळे हिरेन यांची हत्या करण्यात आली आहे,' असा आरोप करत हिरेन मनसुख (Hiren Mansukh Death Case) यांची पत्नी आणि मुलगा यांनी दहशतवादी विरोधी पथक (ATS) पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक लगेच कामाला देखील लागलं आहे.

याकरता ATSने विशेष पथकं बनवली असून या पथकात मुंबई एटीएस, ठाणे एटीएस, पुणे एटीएस, नाशिक एटीएस यांच्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच जवळपास 10 टीम या तपासाकरता बनवण्यात आल्या आहेत.

टीम नंबर 1 : हिरेन यांच्या मोबाईलचा शोध घेणार

हिरेन मनसुख यांच्या मोबाईलचा शोध घेण्यात ये आहेत. कारण हिरेन मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला होता, तर त्यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन हे वसई विरार येथील मांडवी परिसरात आढळले आहे.

टीम नंबर 2 : कांदिवली क्राईम ब्रांचचा तावडे नावाचा तो अधिकारी कोण? याचा शोध घेणार

हिरेन मनसुख यांना 5 मार्चला रात्री कांदिवली क्राईम ब्रांचमधील तावडे नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला होता. तो अधिकारी कोण आहे? कुठे आहे? खरंच असा कोण अधिकारी आहे का? याचा शोध घेणार

टीम नंबर 3 : हिरेन मनसुख यांच्याशी संपर्कातील व्यक्तींची चौकशी करणार

हिरेन मनसुख हे कधी, कुठे, कसे आणि कोणा-कोणाच्या संपर्कात होते, याबाबत माहिती घेवून त्या सर्वांची टीम नंबर 3 चौकशी करणार

टीम नंबर 4 : हिरेन मनसुख यांचे फोन डिटेल्स तपासणार

हिरेन मनसुख यांनी कोणा कोणाला फोन केले होते. तसंच हिरेन मनसुख यांना कोणी कोणी फोन केले होते त्या सर्व मोबाईल नंबरची माहिती काढून ही टीम आरोपींचा शोध घेणार

हेही वाचा - कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या; गांजा कनेक्शन आलं समोर

टीम नंबर 5 : हिरेन मनसुख यांच्या मृत्यूचे रि क्रिएशन करणार

हिरेन मनसुख यांचा चेहऱ्यावर ज्या गडद लाल रंगाच्या खुना सापडल्या आहेत त्या खुना कशामुळे येवू शकतात म्हणजे त्यांची हत्या करताना त्या खुना आल्या आहेत की ते पाण्यात पडले तेव्हा चेहऱ्यांवर त्या खुना आल्या असतील याचा निष्कर्ष काढण्याकरता वेगवेगळ्या घटनांचे रि क्रिएशन केले जाणार आहे

टीम नंबर 6 : हिरेन मनसुख यांनी 17 फेब्रुवारीच्या रात्री गाडी का आणि कशी सोडली याचा शोध घेणार

हिरेन यांच्या गाडीत बिघाड आल्याने त्यांनी त्यांची हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही विक्रोळी येथे सोडली होती. ती कुठे सोडली होती, त्यानंतर काय घडलं याचा शोध ही टीम घेणार

टीम नंबर 7 : हिरेन यांची हिरव्या रंगाची गाडीचे किती मालक होते, ती गाडी कोणी कोणी वापरली याचा शोध घेणार

असं कळतय की हिरेन यांची हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीचे आणखी दोन मालक आहेत. तसंच काही कारणास्तव हिरेन यांनी ही गाडी शेवटच्या मालकाकडून घेतली होती... ते गाडीचे आधीचे मालक कोण? हिरेन यांनी ही गाडी का घेतली आणि यांतून आरोपीबाबत काही लिंक लागतेय का? याचा शोध ही टीम घेणार

टीम नंबर 8 : 5 मार्चच्या रात्रीचे हिरेन यांच्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार

हिरेन यांच्या दुकानापासून ते हिरेन यांचे घर आणि पुढे घोडबंदर रोड असा हिरेन यांनी 5 मार्चला केलेला प्रवास या सर्व प्रवासादरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज ही टीम तपासणार

टीम नंबर 9 : मुंबई ते नाशिक व्हाया ठाणे, मुंबई ते पुणे व्हाया ठाणे आणि मुंबई ते वसई व्हाया ठाणे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणार

पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी मुलुंड टोलनाक्याहून कुठे गेली यासाठी मुंबई ते नाशिक व्हाया ठाणे, मुंबई ते पुणे व्हाया ठाणे आणि मुंबई ते वसई व्हाया ठाणे सर्व हॉटेल, गॅरेज, पेट्रोल पंप आणि टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज ही टीम तपासणार कारण जर हिरेन यांची हत्या झाली असेल तर नक्कीच या इनोव्हा गाडीतील दोघांचा त्यात समावेश असेल

टीम नंबर 10 : जर हिरेन मनसुख यांची हत्या करण्यात आली असेल तर त्या मागे काही दहशतवादी अँगल आहे का? याचा शोध ही टीम घेणार

दरम्यान, हिरेन यांची हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी... त्या गाडीत सोडलेले धमकीचे पत्र आणि हिरेन यांचा जबाब मुंबई पोलिसांनी घेतल्यानंतर यामध्ये दहशतवादी संघटनांचा हात आहे, असं बोललं जात आहे, तसंच काही दिवसांनी हिरेन मनसुख यांचा रहस्यमय मृत्यू झाला. ज्या पद्धतीने हे सर्व घडलं आहे ते पाहता यामागे मोठी आणि सराईत गुन्हेगारांची संघटना असल्याचा दहशतवादी विरोधी पथकाला संशय आहे. त्यामुळे हे 10 नंबरचे पथक दहशतवादी अँगलने तपास करणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 7, 2021, 11:08 PM IST

ताज्या बातम्या