Home /News /mumbai /

मुंबईतील विद्यार्थी आंदोलन प्रकरण: 'हिंदुस्तानी भाऊ'ला अटक, विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप

मुंबईतील विद्यार्थी आंदोलन प्रकरण: 'हिंदुस्तानी भाऊ'ला अटक, विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप

मुंबईत 31 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या आंदोलन प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

    मुंबई, 1 फेब्रवारी : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन (Online examination) घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केलं (Students protest). मुंबईतही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) अर्थात विकास पाठक (Vikas Pathak) याला अटक केली आहे. धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वप्रथम हिंदुस्थानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विकास पाठक यानेच 30 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला. एवढंच नाहीतर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याची सूचना सुद्धा केली होती. वाचा : राज्यात रस्त्यावर का उतरले 10वी, 12वीचे विद्यार्थी? अचानक का पेटला मुद्दा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. पण, या निर्णयाच्या विरोधात नागपूर, मुंबई, पुणे आणि बीडमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संशय व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले. वाचा : 'हिंदुस्तानी भाऊ'नेच दिला होता विद्यार्थ्यांना शिक्षणमत्र्यांच्या घराचा पत्ता, व्हिडीओ आला समोर 'नोटीस न देता आंदोलन करण योग्य नाही, काही ठिकाणी मुलं आंदोलन करत असली तरी लाखो लोक मेसेज करत आहेत की परीक्षा घ्या, पण चुकीचा पायंडा पाडायचा नाही, कमी गुणांचा पेपर घेतला जाऊ शकतो का हा विचार करू शकतो, पण परीक्षा घेऊ नये असं होणार नाही, असंही गृहमंत्री म्हणाले. तसंच, मुलांना रस्त्यावर उतरवणं योग्य नाही, आता हे कुणी केलंय याचा गृहविभाग चौकशी करेल. आंदोलन होत असलेल्या ठिकाणी गर्दी नियंत्रणात आणावी असे आदेश त्या त्या विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai police, Student

    पुढील बातम्या