मुंबई, 18 मार्च : सहा महिन्यांआधी एकमेकांना ओळखतही नसणाऱ्या दोन वेगळ्या धर्माच्या, देशाच्या दोन टोकांना राहणाऱ्या महिलांनी एकमेकींसाठी एक वेगळंच दान केलं. एकीकडे हिंदू-मुस्लीम एेक्याची केवळ गप्पा होत असताना, ठाणे आणि बिहारच्या एका गावात राहणाऱ्या महिलांनी हे ऐक्य सत्यात उतरविलं आहे.
ठाण्यात राहणारे नदीम आणि नाजरीनची बिहारमध्ये राहमाऱ्या रामस्वार्थ यादव आणि सत्यादेवी यांच्याशी नुकतीच ओळख झाली होती. रामस्वार्थ आणि नदीम या या दोघांनाही मूत्रपिंडाचा विकार होता. त्यांची किडनी निकामी झालेली होती. दोघंही त्यांच्या शरीराला मॅच होणाऱ्या किडनीदात्याची वाट बघत होते. नातेवाईकांकडून मदत मिळत नसल्याने आपल्या डॉक्टरांच्या मदतीने या महिलांनीच उपाय शोधला.
मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्यांच्या पतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान नाजरीन आणि सत्यादेवी यांची ओळख झाली होती. एकीकडे नाजरीन यांचे पती नदीम गेली 4 वर्षं डायलिसिसवर होते, तर रामस्वार्थ किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या दोन्ही परिवारांना किडनीची गरज होती, मात्र नातेवाईकांकडून कोणतीच मदत मिळत नव्हती. अखेर सैफी हॉस्पिटलचे नेफ्रॉलजिस्ट हेमल शाह यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी किडनी स्वॅपची योजना त्यांना सांगितली. रामस्वार्थ यांचा रस्तगट (A) होता, जो नाजरीन यांच्या रक्तगटाशी मिळता होता. तर, नदीम यांचा रक्तगट (B) होता जो सत्यादेवी यांच्याशी मिळत होता. एक महिना विचारविनिमय करुन अखेर, दोन्ही परिवार किडनी ट्रान्सप्लान्टकरिता तयार झाले. या दोन्ही महिलांच्या या ऐक्यामुळे जणू त्यांच्या पतीचा पुनर्जन्म झाला.
=======================================================================
VIDEO: प्रकृती बिघडल्यामुळे पर्रिकरांनी संरक्षण मंत्रिपद सोडलं; पवार यांनी व्यक्त केला शोक