महाराष्ट्र हादरला! एकाच दिवसात सर्वात जास्त 5024 जणांची वाढ, एकूण आकडा गेला दीड लाखांवर

महाराष्ट्र हादरला! एकाच दिवसात सर्वात जास्त 5024 जणांची वाढ, एकूण आकडा गेला दीड लाखांवर

मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 72175 वर गेलीय तर मृत्यूसंख्या 4179 वर गेली आहें.

  • Share this:

मुंबई 26 जून: अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत होत असलेली वाढ अजुनही सुरूच आहे. आज तर आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5024 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 152765वर गेला आहे. तर आज 175 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7106 वर गेला आहे. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 72175 वर गेलीय तर मृत्यूसंख्या 4179 वर गेली आहें.

आज 2662 रुग्णबरे होऊन घरी गेलेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 89815वर गेली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 52.25 वर गेला आहे.

ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा (Covid-19) विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh tope)यांनी दिली. Coronavirus ची साथ अनलॉकनंतर सातत्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यात आता Unlock 2 अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या सूचना येणार आहेत.

राज्यात यापुढे लॉकडाऊन नाहीच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुण्यात मोठी घोषणा

निर्बंध आणखी सैल होणार आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून WHO स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांनी कोरोनाच्या मोठ्या लाटेची शक्यता पुढच्या वर्षात वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात या दृष्टीने अधिकचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि ICU, व्हेंटिलेटर यांची सोय करण्यात येत आहे, असं टोपे म्हणाले.

राज्यात यापुढं लॉकडाऊन नसणार आहे. आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात आता अनलॉक 2-3 असेल, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

VIDEO: कोरोनावरून ‘मनसे’चा औरंगाबादमध्ये राडा, उपायुक्तांना खुर्ची फेकून मारली

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत याची चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढत आहे, याबाबत आहे, असेही टोपेंनी यावेळी सांगितलं. विरोधकांच्या टीकेत तथ्य नाही. कोरोनामुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते म्हणाले.

संकलन - अजय कौटिकवार

 

First published: June 26, 2020, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading