राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या दिवशीही धक्कादायक वाढ, 14 हजारांपेक्षा जास्त जणांची पडली भर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या दिवशीही धक्कादायक वाढ, 14 हजारांपेक्षा जास्त जणांची पडली भर

राज्यात आत्तापर्यंत करोनाबधितांची संख्या 6 लाख 57 हजार 450 एवढी झालीय.

  • Share this:

मुंबई 21 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रमी आणि धक्कादायक वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारी 14 हजार 161 नवे रुग्ण सापडले. दिवसभरात 339 जणांचा मृत्यू झाला. तर 11 हजार 749 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.39 टक्के आहे. तर राज्यात 1 लाख 65 हजर 162 Active रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत करोनाबधितांची संख्या 6 लाख 57 हजार 450 एवढी झालीय. तर ठाणे महापालिका क्षेत्रात 183 कोरोणा पॉझीटिव्ह  रुग्णांची नोंद झाली.

20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत सर्वात जास्त रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारपर्यंत  24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COVID-19: सर्व जगाला प्रतिक्षा, मात्र हे लोक म्हणतात लसच नको; WHOही हादरलं

कोविड-१९ साथ रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व शासनस्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आले आहे.  या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव - २०२० साजरा करताना विसर्जनादरम्‍यान पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचनाही केल्या आहेत. त्याचं पालन करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 21, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या