राज्यात COVID-19च्या रुग्णांनी ओलांडला नवा उच्चांक, 24 तासांत आढळले 6330 रुग्ण

राज्यात COVID-19च्या रुग्णांनी ओलांडला नवा उच्चांक, 24 तासांत आढळले 6330 रुग्ण

  • Share this:

मुंबई 2 जुलै:  राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 186626 झाली आहे. तर फक्त मुंबईत 80,699 रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 1554 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात बाधित रुग्णांची संख्या एक हजार 921 तर, 31 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 36 हजार 567 तर, मृतांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचं कारण समूह संसर्ग (Community transmission) हे आहे का, यावर उलट सुटल चर्चा सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काही भागात थोड्या प्रमाणावर कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचं म्हटलं. पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक मोठ्या शहरी भागांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पण या कडक टाळेबंदीचा कम्युनिटी ट्रान्समिशनशी संबंध जोडू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी PTI शी बोलताना समूह संसर्गाची शक्यता फेटाळून लावली. 'राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही', असं टोपे म्हणाले आहेत.

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या (Corona patients in Pune) दिवसेंदिवस वाढतच आहे. हा उद्रेक आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. Unlock सुरू असल्याने गर्दी वाढली आहे. व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. पुण्यात टेस्टिंग (Covid-19 Test)वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18 हजार पेशंट्स हे Activeअसू शकतात, अशी माहिती पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली.

हे वाचा - घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant

पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने मनपाकडे उपलब्ध असलेले व्हेंटिलेटरर्स आता ससून हॉस्पिटलला दिले जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुण्यात तुर्तास पुन्हा लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचा खुलासाही आयुक्तांनी केला. यासोबतच लक्षणं नसलेल्या कोरोना पेशंट्सनी विनाकारण बेड्स अडवून ठेऊ नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर Unlock 1 मध्येच राज्यात मोठ्या वेगाने Coronavirus चा प्रसार झाला. ठाणे, पुणे या शहरांमध्ये दुपटीपेक्षा अधिक रुग्ण याच काळात वाढले. मुंबईतही सातत्याने कोरोनारुग्ण वाढत आहेत.

हे वाचा - VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

विशेषतः मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये या काळात कोरोनारुग्णांचं प्रमाण वाढलं. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर, पनवेल आदी उपनगरांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. याबाबत बोलताना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "हा समूह संसर्गाचा प्रकार असू शकतो. मुंबईच्या आसपासच्या परिसरात 15 ते 20 टक्के कम्युनिटी स्प्रेड आहे. सरकार त्यावर काम करत आहे. म्हणूनच मुंबई महानगर परिसरातल्या काही भागांत लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत."

First published: July 2, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading