रमेश कदमला दणका, अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी कोर्टाने नाकारली

रमेश कदमला दणका, अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी कोर्टाने नाकारली

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार रमेश कदम यांचा पावसाळी अधिवेशनास उपस्थिती राहण्यासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 02 आॅगस्ट : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार रमेश कदम यांचा पावसाळी अधिवेशनास उपस्थिती राहण्यासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे कदम यांना पुन्हा एकदा दणका मिळाला आहे.

'मला विधानसभा अधिवेशनात सहभागी व्हायचंय, अधिवेशनात मला मंजुळा शेट्ये प्रकरणी अनेक खुलासे करायचे आहेत, किमान मला मुख्यमंत्र्यांना तरी भेटू द्या,' अशा तीन मागण्या रमेश कदम यांनी अर्जाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केल्या होत्या.

पण, तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तुम्ही अटकेत आहात त्यामुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही, मंजुळा शेट्ये प्रकरणात तुम्हाला जबाब नोंदवायचा असेल तर तो तपास अधिकाऱ्यांकडे नोंदवा, मुख्यमंत्री न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करू शकत नाहीत, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश कदम यांच्या तिन्ही मागण्या फेटाळल्या. त्यामुळे रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणाका दिलाय.

First published: August 2, 2017, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading