1 तासात संप संपवा! हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश

1 तासात संप संपवा! हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश

500 रुपयांच्या ऐवजी 1250 च्या वाढीवर हा संप मागे घेतला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : एक तासाच्या आत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्या, असा आदेश मुंबई हायकोर्टाने बेस्टच्या कामगार संघटनांना दिला आहे. 500 रुपयांच्या ऐवजी 1250 च्या वाढीवर हा संप मागे घेतला जाणार आहे.

उच्चस्तरीय समितीनं सुचवलेल्या आणि बेस्ट प्रशासनानं दिलेल्या पहिल्या १० मुद्यांच्या प्रस्तावावर कामगार समाधानी झाले. त्यानंतर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट संप मागे घेतला जाणार आहे.

हा आहे 10 सुत्री फॉर्मुला

बेसिक वेतन 7930  ऐवजी  6680  वर तडजोड

500 रुपयांच्या ऐवजी 1250 च्या वाढीवर संप मागे घेतला जाणार

जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ लागू

संपकरी कामगारांविरोधात कोणतीही  कारवाई होणार नाही.

पुढील मागण्यांच्या चर्चेसाठी मध्यस्थदेखील असणार

तीन महिन्यात मध्यस्थ चर्चा पूर्ण करणार

ग्रेड पे आता 1250 ने वाढून 6680 झाली

बेस्ट चं बजेट महापालिकेच्या बजेटमध्ये विलिन करण्याचा निर्णयावर चर्चा करणार

बेस्टचा तोटा कसा कमी करता येईल यावरही तज्ज्ञ समिती निर्णय घेणार.

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल यावर कामगार संघटनांकडून मतं मागविणार.

Special Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव

First published: January 16, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading