रायगडमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी; बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री ताब्यात! Rave Party | Bollywood Actress | Mumbai Police

रायगडमधील किहीम बीचवरील एका बंगल्यात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 11:04 AM IST

रायगडमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी; बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री ताब्यात! Rave Party | Bollywood Actress | Mumbai Police

मुंबई, 29 जून: बॉलिवूडमध्ये एका बाजूला आदित्य पंचोलीने एका अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रायगड पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. रायगडमधील किहीम बीचवरील एका बंगल्यात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीतून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे तसेच अमली पदार्थ देखील जप्त केले आहेत.

किहीम बीचवरील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथील एका आलिशान बंगल्यावर छापा टाकला. पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केले जात होते. पोलिसांनी पार्टीतील लोकांना ताब्यात गेतले आहे. हायप्रोफाईल पार्टीत बॉलिवूड तसेच टीव्ही मालिकेतील अनेक अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. अर्थात या अभिनेत्रींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. अटक करण्यात आलेल्यामध्ये अनेकांनी अंमली पदार्थांचे सेवण केले होते असे सूत्रांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार ही रेव्ह पार्टी एका व्यावसायिकाने आयोजित केली होती. पोलिसांनी या पार्टीतून अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले होते. रेव्हा पार्टीतून ताब्यात घेतलेल्या सर्वांना लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याचे समजते.

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 10:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...