Home /News /mumbai /

Mumbai Local Train News : खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं हा गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

Mumbai Local Train News : खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं हा गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

Mumbai Local Train News : रेल्वे न्यायाधिकरणाने नितीन हुंडीवाला यांच्यासोबत झालेला अपघात 'स्वतःची चूक आणि फौजदारी कायद्याच्या कक्षेत' असल्याचं म्हटलं. त्याविरोधात नितीन हुंडीवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    मुंबई, 27 एप्रिल : मुंबईची ओळख असलेली लोकल ट्रेन नेहमी गर्दीने खचाखच भरलेली असते. अनेक वेळा लोकलमधून पडून अनेक जण जखमीही होतात. पण, अलीकडेच लोकल ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या वृद्धाला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत. त्याचवेळी, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की, 'गर्दीच्या (Over crowded) लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं हे गुन्हेगारी कृत्य असू शकत नाही.' नितीन हुंडीवाला असं या वृद्धाचं नाव आहे. हुंडीवाला यांना 3 लाख 10 हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश हायकोर्टानं रेल्वेला दिले. नितीन हुंडीवाला लोकल ट्रेनमधून पडल्याने जखमी झाले होते. यानंतर त्यांनी भरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. मात्र, रेल्वे न्यायाधिकरणाने नितीन हुंडीवाला यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अपघात कधी आणि कसा झाला ही घटना 23 नोव्हेंबर 2011 ची आहे. नितीन हुंडीवाला हे त्यांच्या विक्रोळी येथील कार्यालयातून दहिसरला घराकडे निघाले होते. तिथं ते एका एंटरप्राइझमध्ये सल्लागार म्हणून दरमहा 10 हजार रुपये पगारावर काम करत होते. कार्यालयातून घरी जाण्यासाठी विक्रोळीहून दादरला जाणार्‍या ट्रेनमध्ये चढले. तेथून तो दहिसर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आला. यानंतर ते पहाटे 5.26 वाजता फास्ट विरार लोकल ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीच्या जनरल डब्यात चढले. डब्यात लोकांची प्रचंड गर्दी होती. ट्रेनमध्ये चढत असताना जमावाकडून डब्यातून ढकलले गेल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले. चुकून त्याचा सरळ पाय घसरला आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये मोकळ्या जागेत गेला आणि ते पडले. त्यांच्या डोक्याला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली. (हे वाचा - Mumbai Police आयुक्तांवर सोमय्यांचा गंभीर आरोप, राज्यपालांना भेटून तक्रार करणार) नितीन हुंडीवाला 14 दिवस रुग्णालयात दाखल होते. त्याच्या उपचारावर सुमारे दोन लाख रुपये खर्च झाले. उपचारानंतरही तो पूर्णपणे बरा झालेले नाहीत. त्यांना लांब अंतर चालणं, जड वस्तू उचलणं, पायऱ्या चढणं शक्य होत नाही. हा अपघात झाला तेव्हा ते 70 वर्षांचे होते. या प्रकरणी त्यांनी चार लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. नितीन हुंडीवाला यांनी रेल्वे न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला. यावर रेल्वे दावा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने नितीन हुंडीवाला यांचा दावा फेटाळून लावला. रेल्वे न्यायाधिकरणाने नितीन हुंडीवाला यांच्यासोबत झालेला अपघात 'स्वतःची चूक आणि फौजदारी कायद्याच्या कक्षेत' असल्याचं म्हटलं. त्याविरोधात नितीन हुंडीवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (हे वाचा - MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरतीची घोषणा) त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती डांगरे म्हणाल्या की, न्यायाधिकरणाने नितीन हुंडीवालाचा खटला ‘फौजदारी कायद्या’च्या कक्षेत आणणं चूक आहे. त्यात असं कोणतंही कारण नाही. नितीन हुंडीवाला यांनी अपघातानंतर ड्युटीवर जाऊ शकत नाहीत. याचा अर्थ ते प्रवास करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं होतं, असेही न्यायमूर्ती डांगरे यांनी नमूद केले. अपघातामुळे त्यांना जास्त वेळ चालता येत नाही. जिने चढणे आदी जे त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक आहे, ते करता येत नाही. या कारणास्तव हायकोर्टाने नितीन हुंडीवालाला 3.10 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश रेल्वेला दिले.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Mumbai high court, Mumbai local, Running local

    पुढील बातम्या