दहिहंडी थराचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात

मुंबई हायकोर्टानं आज तसा आदेश दिला. १८ वर्षांच्या गोविंदांनी सहभागी व्हायचं की नाही आणि २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे मानवी मनोरे असावेत की नाही हे राज्य विधिमंडळानं ठरवावं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2017 04:16 PM IST

दहिहंडी थराचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात

विवेक कुलकर्णी, मुंबई, 07 आॅगस्ट : दहीहंडीसाठी किती थर असावेत, याचा निर्णय राज्य सरकारलाच घ्यायचाय. मुंबई हायकोर्टानं आज तसा आदेश दिला. १८ वर्षांच्या गोविंदांनी सहभागी व्हायचं की नाही आणि २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे मानवी मनोरे असावेत की नाही हे राज्य विधिमंडळानं ठरवावं.

राज्य सरकारनं दहीहंडीची उंची आणि गोविंदाचं वय ठरवावं असं म्हणत मुंबई  हायकोर्टानं दहीहंडीतील गोविंदा पथकांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं दहीहंडीची उंची काय असावी हे कोर्टासमोर सांगितले नाही पण गोविंदांची वयोमर्यादा मात्र १४ वर्षं इतकी ठेवली असल्याची माहिती कोर्टाला दिली. दहीहंडीतील

गोविंदांचं वय आणि दहीहंडीची उंची काय असावी हे याची सुनावणी मुंबई हायकोर्टानं आज म्हणजे ७ आॅगस्टला घ्यावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता त्यानुसार आजची सुनावणी झाली. २०१४ साली दिलेल्या आदेशात कोर्टाने वयोमर्यादा १८ इतकी ठेवली होती. याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी आज युक्तिवाद करताना दहिहंडीच्या वाढीव उंचीमुळे आणि कमी वयांच्या गोविंदांमुळे अपघात झालेल्या काही गोंविदांचा मृत्यू होतो आणि काही गोविंदांना कायमस्वरुपी अपंगत्व येतं असं म्हटले. मात्र मुंबई हायकोर्टानं सेल्फी घेतानादेखील अपघात होतात, ट्रेडमिलवरुन पडूनही अपघात होतात, टाॅयलेट्समध्ये पडूनही अपघात होतात मग या सगळ्यांवर निर्बंध घालायचे का सवाल केला.

राज्य सरकारनंही आंतरराष्ट्रीय खेळाडू पूर्ण काळजी घेतल्यानंतर जखमी होतात असा युक्तिवाद केला. दहिहंडीच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यात याव्यात आणि सुरक्षेचे उपाय योजण्यात यावेत असं आपल्या आदेशात कोर्टाने सांगितले आहे.

आयोजकांनी वैद्यकीय सेवा आणि अॅम्ब्युलन्स तयार ठेवावी आणि जखमी गोविदांना लगेच रुग्णालयात नेता येईल हे पाहावं, असे आदेश कोर्टानं दिले. गोविंदांना १४ वर्षांची मर्यादा आहे, असं सरकारनं कोर्टात सांगितलं. पण याचिकाकर्ते यावर समाधानी नाहीयेत. ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...