मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत 4 आठवड्यांत उत्तर द्या, कोर्टाचे बीएमसीला आदेश

बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत 4 आठवड्यांत उत्तर द्या, कोर्टाचे बीएमसीला आदेश

केंद्र सरकारच्या एका निर्णयानुसार सरकारी बंगल्यांचे रुपांतर स्मारकात करता येत नसल्यानं हे स्मारक केलं जाऊ नये अशी रयानी यांची मागणी

विवेक कुलकर्णी, मुंबई

20 जुलै : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यावरील प्रस्तावित स्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुंबई महापालिकेनं ४ आठवड्यांची मुदत मुंबई हायकोर्टाकडे मागितली असून कोर्टाने ती मंजूर केली आहे.

भगवानजी रायानी यांनी बाळासाहेबांच्या दादर इथल्या शिवाजी पार्क इथं असलेल्या महापौर बंगल्याच्या जागी होऊ घातलेल्या स्मारकाला विरोध करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका आदेशानुसार आणि केंद्र सरकारच्या एका निर्णयानुसार सरकारी बंगल्यांचे रुपांतर स्मारकात करता येत नसल्यानं हे स्मारक केलं जाऊ नये अशी रयानी यांची मागणी आहे.

First published:

Tags: BMC, बाळासाहेब ठाकरे