कमला मिल आगप्रकरणी हायकोर्टाचे नव्याने फायर आॅडिटचे आदेश

मुंबईतील सगळे पब, रेस्टाॅरंट, हाॅटेल्स, रस्त्यावरचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या सगळ्या ठिकाणच्या अग्नी सुरक्षितता तपासा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.ज्यांना आत्ता परवाने दिले आहेत, फायर प्रमाणपत्र दिलं आहेत त्यांचीही पुन्हा तपासणी करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2018 07:39 PM IST

कमला मिल आगप्रकरणी हायकोर्टाचे नव्याने फायर आॅडिटचे आदेश

15 जानेवारी : मुंबईतील सगळे पब, रेस्टाॅरंट, हाॅटेल्स, रस्त्यावरचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या सगळ्या ठिकाणच्या अग्नी सुरक्षितता तपासा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.ज्यांना आत्ता परवाने दिले आहेत, फायर प्रमाणपत्र दिलं आहेत त्यांचीही पुन्हा तपासणी करा असे आदेश मुंबई  हायकोर्टानं दिले आहेत.मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडव प्रकरणी  मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि बीएमसीला  खडेबोल सुनावलेत.

कमला मिल दुर्घटना ही प्रशासनाचे डोळे उघडणारी ठरलीय असं  मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. या रेस्टॉरंटकडे काही परवानग्या नसताना आपला व्यवसाय करत होत्या, हे कसं घडतंय, असा सवाल हायकोर्टानं केलाय.  सगळ्या हॉटेल्सचं सर्व्हे करा असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. हॉटेलसाठी कोणत्या परवानग्या लागतात, फायर सेफ्टीच्या कोणत्या परवानग्या लागतात ते सांगण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या ठिकाणी अग्निरोधक नियमावलीचं योग्य रितीने पालन होतंय की नाही, यावर स्थानिक प्रशासन या नात्यानं पालिकेची देखरेख हवी असंही हायकोर्टानं म्हटलंय.तसंच परवाने जारी केल्यानंतरही त्याठिकाणी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होतय की नाही, याची पडताळणी प्रशासनाकडनं व्हायला हवी असंही हायकोर्टाचं म्हणणं आहे. त्यावर पालिका गुरुवारी किंवा शुक्रवारी अहवाल सादर करेल अशी माहिती बीएमसीनं हायकोर्टात दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...