हाय अलर्ट, मुंबईवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याची शक्यता

हाय अलर्ट, मुंबईवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याची शक्यता

दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर (Mumbai) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची (Terrorist attack) भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईवर ड्रोन (Drone) आणि मिसाइल हल्ल्याची (Missile attack) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ड्रोन,  रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या छोट्या विमानांनी हा हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.त्याचबरोबर पॅराग्लायडरच्या मदतीनेही हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या पाठोपाठ आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण

मुंबईतील मंदिरं, गर्दीची ठिकाणं ही दहशतवाद्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर आहे. याआधीही मुंबईत घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आला होता.

खबरदारीचा उपाय म्हणून 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून महिन्याभरासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Diwali Offers: Suzukiच्या 'या' वाहनांवर आकर्षक ऑफर; स्विफ्ट जिंकण्याची संधी

तसंच, कुठेही संशयित व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 27, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या