Breaking: बापरे! मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, NDRFचे जवानही सज्ज

कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

  • Share this:
मुंबई 3 ऑगस्ट: कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईवर आता पावसाचं संकटही आलं आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई महापालिकेने हाय अलर्ट दिला आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. 6 अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत. NDRF च्या 3 तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. मिठी नदीची पातळी वाढली तर स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 24 वॉर्डमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून गरज पडल्यास शाळा उघडून ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी 6 पंपिंग स्टेशन्स आणि 299 पंप कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिकेने दिले असून सर्व प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगण्यात आलं आहे. VIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं? पोलीस आयुक्तांची माहिती दरम्यान, मुंबईतल्या सर्वच दुकानांना उघडण्यासाठी सरकारने आता परवानगी दिली आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतरही सरकारने निवडक दुकानांनाच परवानगी दिली होती. आता मात्र सरसकट सगळ्याच दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटरवर विक्री करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती मुंबईतच, बिहार पोलिसांवर भडकले वकील मानेशिंदे देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. यातच 5 ऑगस्टपासून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करण्यात येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. Ministry of Health and Family Welfare याबाबत नियमावली लागू केली आहे आणि सर्व संस्थांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: