Home /News /mumbai /

मुंबईत पावसाचा 'हाय अलर्ट', मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला दिले हे आदेश

मुंबईत पावसाचा 'हाय अलर्ट', मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला दिले हे आदेश

'मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील'

    मुंबई, 18 जुलै : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा (mumbai rain) इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका (mumbai municipal corporation) तसंच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सुचना केल्या. विशेषत: दरडी  कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटन घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.  उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे. काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसा झाले आहे तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. रात्री उपाशी पोटी झोपायची सवय आजच बंद करा; आरोग्य घालताय धोक्यात... 'पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रान, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे. पाउस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा, असंही मुख्यमंत्र्यांना सांगितलं. ‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात कोरोना नियम धाब्यावर सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्यने संपर्कात राहण्यास सांगावे. कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे. अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटन होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. हवामान विभागाचा ऑरेंज इशारा हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की, 'मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ ताराखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BMC, Mumbai

    पुढील बातम्या