मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पावसाचा हायअलर्ट, महापूजेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सोमवारीच निघणार पंढरपुरला!

पावसाचा हायअलर्ट, महापूजेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सोमवारीच निघणार पंढरपुरला!

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा (cm uddhav thackeray pandharpur mahapuja) करणार आहेत.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा (cm uddhav thackeray pandharpur mahapuja) करणार आहेत.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा (cm uddhav thackeray pandharpur mahapuja) करणार आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 18 जुलै : कोरोनाच्या (corona) परिस्थितीमुळे यंदाही पंढरपूरच्या वारीला काटेकोर नियमांचे पालन करून पूर्ण करावी लागली आहे. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) आपल्या कुटुंबासह सोमवारीच कुटुंबासह पंढरपूरला रवाना होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढपूर दौऱ्यावर सोमवारीच रवाना होणार आहे. सोमवारी दुपारी मातोश्रीहून निघणार आहेत. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा (cm uddhav thackeray pandharpur mahapuja) करणार आहेत.

मुंबईत पावसाचा 'हाय अलर्ट', मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला दिले हे आदेश

आज मुंबई आणि पुणे परीसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक आणि विमान किंवा हेलीकॉप्टर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निच्छित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विणेकरी केशव कोलते दाम्पत्याला मिळणार मुख्यमंत्र्यांसमवेत महापुजेचा मान

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरची आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात साजरी होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 20 जुलै रोजी पहाटे विठ्ठल- रूक्मिणीची सपत्निक शासकीय महापूजा करणार आहेत आणि त्यांच्या समवेत महापुजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी सौ इंदूबाई यांना मिळाला आहे.

मानाचे वारकरी असणारे केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील असून त्यांचे वय 71 वर्षे आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षांपासून वारी भरत नसल्याने महापुजेचा मान विणेकऱ्यांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. केशव कोलते यांची निवड ईश्वर चिठ्ठीव्दारे करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत महापुजेचा मान मिळाल्याने त्यांना आनंद झाला आहे.

First published:

Tags: Pankaja munde