अवकाळी पावसाचा लोकलला फटका, मध्य-हार्बर रेल्वे विस्कळीत

अवकाळी पावसाचा लोकलला फटका, मध्य-हार्बर रेल्वे विस्कळीत

. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झालीये. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं गाड्या उशिराने धावत आहे.

  • Share this:

12 मे : मुंबईत संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान मेघ गर्जनेसह पाऊस पडला 5 ते 10 मिनिटे हा पाऊस पडला पण मुंबईकर चाकरमान्यांचे हाल करून गेला. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झालीये. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं गाड्या उशिराने धावत आहे.

हार्बर मार्गावर मानखुर्द ते वाशी दरम्यान पाऊस पडल्यावर ओव्हरहेड वायर मध्ये सपार्किंग झालं आणि लोकल बंद पडली तसंच मानखुर्द स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलच्या ओव्हर हेड वायर पाणी पडल्याने मोठे सापरिकिंग झाले. त्यामुळे प्रवाश्याना भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि पटापट लोकलमधून बाहेर पडले.

तर घाटकोपर स्टेशनवर कल्याणकडे जाणारी लोकल आली असता ओव्हर हेड वायरवर पावसाचे पाणी पडल्याने 15 डब्याची कल्याणकडे जाणारी लोकल बंद पडली. त्यामुळे जलद वाहतूक 46 मिनिटे बंद पडली. कुर्ल्याहून इंजिनिअर आल्यावर ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यात आल्यावर ही लोकल कल्याणकडे रवाना झाली. थोड्या पडलेल्या पावसाने मात्र चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले असून रेल्वेची यामुळे पोलखोल झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 11:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading