Home /News /mumbai /

हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का ?

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का ?

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का ?

    मुंबई, 15 मे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (rss) काँग्रेस (congress) जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का हेडगेवार (doctor keshav baliram hedgewar) यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये आहे'असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis speech) यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का डॉक्टर हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये आहे. हे त्यावेळी ते जेलमध्ये होते. जंगल सत्याग्रहामध्ये त्यांच्याासोबत अनेक कार्यकर्ते होते. याची माहिती तरी तुम्हाला आहे का. त्याच वेळी आणीबाणी लागली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणीबाणी लागली त्यावेळी तुम्ही कुणाच्या बाजूला होता? त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींच्या बाजूला होता'असा दावा फडणवीस यांनी केली. ('ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान) 'त्यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र असल्याचं बोलतात. अरे कुणाच्या बापाची औकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं? मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो. काल जनसंघामध्ये बोलले. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅजेटियनमध्ये लिहिले आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीत जनसंघ होता. काय मनात येईल ते बोलायचं. इतिहास वाचायचा नाही.जेव्हा बोलायला काही नसलं की मुंबई वेगळी करायाचीय. अरे मुंबई आम्हाला वेगळी करायची आहेच. पण महाराष्ट्रापासून नाही तर तुमच्या भ्रष्टाचारापासून मुक्त करायची आहे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. (watermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, शेतकरी मात्र बेहाल!) उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा. जितकं वरती वाटतं त्यापेक्षा दप्पट खाली आहे'असा सणसणीत टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या