मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पुढील काही तासांमध्ये वाढणार असून मुंबईसह, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 09:12 PM IST

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, 8 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पुढील काही तासांमध्ये वाढणार असून मुंबईसह, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईकरांनाही गरज पडल्यासच बाहेर पडण्याच्या सुचना महापालिकेने दिल्या आहेत.

Loading...

विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी नऊ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. अतिमहत्त्वाची कामे असल्यासच घराबाहेर पडावे, असाही इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला

नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून वीस मार्ग बंद आहेत. जवळपास तीनशे गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडची पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. हेलिकॉप्टरने जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारी बाजुने भामरागडला वेढा दिल्यानं सहाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

संततधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. मिलकराम इसाराम शेंडे (54) याचा भिंतीच्या खाली दबून मृत्यू झाला आहे. तर कुंदा नेवारे (24) आणि निर्मला श्यामराव वगरे (50) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

गडचिरोलीच्या महापूरात अडकलेल्या 4 जणांसह 500 मेढ्यांची थरारक सुटका!

गडचिरोलीतल्या महापूरात राञीपासुन अडकलेल्या चार नागरीकासह पाचशे मेंढयांची पोलिंसांनी सुरक्षीत सुटका केली. गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीच्या पुरात राञीपासुन चार नागरीक आणि पाचशे मेंढया अडकल्या होत्या. तेलंगणा पोलिसांनी सीमेवरील आपल्या असरअली पोलिसांना वायरलेसवरुन मदतीची मागणी केली होती. त्यानंतर ही सुटका करण्यात आली.

VIDEO: बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील डान्सवर अधिकाऱ्यांचा ठुमका!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...