ठाणे आणि रायगडला धोका कायम, अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातली अनेक धरणं भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्या दुधडी भरून वाहत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 03:45 PM IST

ठाणे आणि रायगडला धोका कायम, अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई 5 ऑगस्ट : मुंबई, कोकण आणि ठाण्यात  गेले काही  तुफान बरसणाऱ्या पावसाचा धोका कायम आहे. पुढचे दोन दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. गेली दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने मुंबई, उपनगरं आणि ठाणे जिल्ह्याला प्रचंड मोठा फटका बसला. रविवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली तरी अनेक भागांमध्ये शिरलेलं पाणी अजून पूर्णपणे ओसरलेलं नाही. लोकांच्या घरांमध्ये आणि अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. रस्ते खराब झाले. या संकटातून सावरण्यासाठी सुरू असलेले मदतकार्य अजून संपलेलं नाही. असं असतानाच पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांच्या पोटात गोळा उठलाय.

MumbaiRain : मध्य रेल्वेवर 12 तासांनी सुटली पहिली लोकल

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झालं. त्यामुळे राज्यातला फक्त काही भाग वगळता सर्वदूर दमदार पाऊस झाला. तर काही भागात अती मुसळधार पाऊस झाला. अतिक्रमण, नैसर्गिक नदी नाले, बुजवणं, अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे मुंबई थोड्याशाही पावसाने ठप्प होते.

आत्तापर्यंत दोन वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होतं तर लाखो लोकांना हालअपेष्टांना सामोरे जावं लागतं. पाऊस एवढा मोठा होता की बचाव कार्यात स्थानिक मदत पथकांसोबतच NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं.

'आम्हाला वाचवण्यासाठी कोणी रिस्क घेत नाही', पावसात अडकलेल्या बस चालकाची व्यथा

Loading...

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागालाही पावसाचा तडाखा बसला. राज्यातली अनेक धरणं भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्या दुधडी भरून वाहत आहेत. नदी काठच्या अनेक गावांमध्ये पाणी भरलंय. तर हजारो लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आलंय.

पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारीही सर्व शाळा कॉलेजेसना सुटी जाहीर करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...