Home /News /mumbai /

Weather Update: राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पुढील 2 दिवस 18 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

Weather Update: राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पुढील 2 दिवस 18 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

Weather Update: आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई, 29 ऑगस्ट: येत्या चार ते पाच दिवसात राज्यात (Maharashtra Rain) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर राज्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण बंगालच्या उपसागरात तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा आता हळहळू उत्तरेकडे सरकत आहे. पण याचा महाराष्ट्रात पावसावर फारसा फरक होणार नाही. हेही वाचा-आता बालसुधारगृहातही कोरोनाचा शिरकाव; उल्हासनगरमध्ये 14 मुलं कोरोना Positive आज हवामान खात्यानं बुलडाणा, अकोला, वाशीम, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या अठरा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या उस्मानाबाद वगळता राज्यात पावसाची हीच स्थिती असणार आहे. हेही वाचा-47 किलो वजन कमी होऊनही कोरोनाला हरवलं; 122 दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून सुटका मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच 31 आणि 1 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बुधवारी पालघर, ठाणे आणि रायगड या तिन जिल्हांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या दोन दिवसांसाठी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळीही मुंबईतील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai rain, Weather forecast

    पुढील बातम्या