महाराष्ट्रात 'या' भागात पुढील 24 तासांत वाढणार पावसाचा जोर, वेधशाळेचा इशारा

महाराष्ट्रात 'या' भागात पुढील 24 तासांत वाढणार पावसाचा जोर, वेधशाळेचा इशारा

जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पण जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल,

  • Share this:

मुंबई, 12 जुलै: मुंबईत रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांत मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा भागात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पाऊस होईल.

हेही वाचा...बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव

जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पण जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असंही कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काही उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. देशातील बहुतांश भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.

पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू होत असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, खडकवासला धरणसाखळीतली चारही धरण भरलेली असल्यामुळे मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे, कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी नदीला पूर आला आहेय नदी धोक्याची पातळीवर दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासन आणि व्यापारी वर्गात चिंतेचं वातवरण पसरलं आहे.

हेही वाचा..भयंकर! रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून कोरोनाग्रस्ताचा रिक्षातून नेला मृतदेह

वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तालुक्यातील बहुतांश कालवे तुडूंब भरले आहेत. काही ठिकाणी पावसाचं पाणी शेतात शिरलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 12, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या