मुंबईत जोरदार पावसाची बॅटिंग, 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत जोरदार पावसाची बॅटिंग, 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात मुंबई आणि उपनगरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • Share this:

07 आॅक्टोबर : मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  मुंबईत  विजांच्या कडकडटासह जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे.  ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. येत्या २४ तासात मुंबई आणि उपनगरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज दुपारपासूनच मुंबईत अनेक भागात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे भर दुपारीच काळोख झाला होता.संध्याकाळी दादर, लोअर परेल, महालक्ष्मी, लालबागसह इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर डोंबिवली, ठाणे, कल्याण परिसरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 08:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading