• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • हिवसाळाच की! मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला नवीन इशारा

हिवसाळाच की! मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला नवीन इशारा

मुंबई, पुण्यासह (Heavy rains in Mumbai and Pune) राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई, पुण्यासह (Heavy rains in Mumbai and Pune) राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई, पुण्यासह (Heavy rains in Mumbai and Pune) राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर : पावसाळा (rain) खरंच संपला की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एकीकडे राज्यात हिवाळ्याला (winter) सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई, पुण्यासह (Heavy rains in Mumbai and Pune) राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्याला तर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमशान घातले आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या धारा बरसत आहे. दादर, माहीम, वरळी आणि दक्षिण मुंबईत संथ गतीने पाऊस पडतोय. पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असं हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर पुण्यात सुद्धा पावसाने संध्याकाळी दमदार हजेरी लावली. पुण्यातील ग्रामीण आणि शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही बसला. शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. पण भाषण सुरू असताना पावसाने हजेरी लावली, त्यामुळे भर पावसात चिंब भिजत चंद्रकांत पाटलांना सभा आटोपती घ्यावी लागली. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करा तर नवी मुंबईमध्येही संध्याकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.  रात्री 8 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या कडकटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. अचानक पाऊस आल्याने नवी मुंबईकरांची कोंडी झाली आहे.  भिवंडी परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस भिवंडी परिसरात विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली असून अचानक पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे भातपीक झोडाणीसाठी खळ्यात ठेवल्याने भात भिजून नुकसान होत असल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत आला आहे. शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस तर, शहापूर तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचू लागले झाले  तालुक्यातील आसनगाव,खर्डी,कसारा,डोलखांब, शेणवा,वाशिंद, किन्हवली, परिसरात विजांच्या कडकडाटासह  जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खळ्यात आणलेले भात पिकासह, नाचणी,वरई, उदीड,खुरासनी,यांचे नुकसान होत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रात्री घरी येणाऱ्या चाकरमान्यांची देखील तारांबळ उडाली असून महामार्गावर देखील तुरळक वाहनांची वर्दळ दिसत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: