सावधान! मान्सून परत फिरणार.. राज्यात होणार वादळी पाऊस

सावधान! मान्सून परत फिरणार.. राज्यात होणार वादळी पाऊस

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

  • Share this:

मुंबई,16 ऑक्टोबर: गेली काही दिवस महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु 18 ऑक्टोबरपासून मान्सून माघारी फिरणार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात दिनांक 19 ते 20 दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे, मत देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

शेतकऱ्यांनो ही काळजी घ्या...

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करताना काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

मान्सूनची महाराष्ट्रातून Exit?

मागील महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा मान्सून महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सूनच हे परत जाणं तब्बल एक महिन्याने लांबल्याची माहिती हवामान विभागाने दिली बुधवारी सकाळी दिली होती. सुरुवातीला थोडा रखडणारा मान्सूनने नंतर सर्व राज्यभर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तर काही भागाकडे पाठ फिरवली. मात्र कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत गेल्या काही दशकांमधला हा सर्वात जास्त पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. परणारा मान्सून अतिशय वेगाने महाराष्ट्राबाहेर जात असून जाताना तो बरसणार का? याकडे सगळ्यांत लक्ष लागलंय.मान्सून परतल्यानंतर ऑक्टोबर हिट भडकण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीय. मंगळवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बऱ्याच भागातून मान्सूनची एक्झिट झाली.

तब्बल महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मान्सूनचं वास्तव्य लांबलं होतं. गेल्याच आठवड्यात उत्तर भारतातून घेतली माघार घेतली होती. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा वेग कमालीचा जास्त असून आज संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. मान्सून हा परवा परवा पर्यंत पुण्यात बरसत होता. कधी नव्हेते काही तासांच्या पावसाने पुणे जलमय झालं होतं. अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरलं. 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आणि कोट्यवधींची हानी झाली.

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूराने तर सर्वच विक्रम मोडीत काढले. वर्षभरात होणारा पाऊस काही दिवसांमध्ये पडला आणि दोन जिल्हे पाण्यात बुडाले होते. हवामानाच्या बदलामुळे पावसाचा हा लहरीपणा वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

VIDEO:मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या