मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा बसणार; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा बसणार; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

येत्या काही दिवसांत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तीन ते चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 जून : मान्सूनचे आगमन झाले असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. येत्या तीन ते चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत (Mumbai Rain) ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Mumbai, Thane Weather Updates) याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह कोकणवासियांना पावसाचा अंदाज घेऊन कामाचे नियोजन आखावे लागणार आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Rain fall