मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यभरात वादळी पाऊस; 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात वादळी पाऊस; 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा

File Photo

File Photo

हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तास इशारा दिला आहे.

मुंबई, 21 जुलै : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण आणि उपनगरातील भागांमध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात वाऱ्यांचा वेग वाढला असून मुसळधार पावसाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. (Some intense clouds over Mumbai Suburbs, Thane Kalyan and adjoining areas)

नुकत्याच सॅटेलाइट चित्रानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या घाट भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्याशिवाय विदर्भातील काही भागातही पावसाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद या भागात येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

First published:
top videos

    Tags: IMD, IMD FORECAST, Mumbai rain