मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यात मुसळधार पावसासह पुन्हा होणार गारपीट; पुढील 5 दिवस अतिमहत्त्वाचे, या जिल्ह्यांत High Alert

राज्यात मुसळधार पावसासह पुन्हा होणार गारपीट; पुढील 5 दिवस अतिमहत्त्वाचे, या जिल्ह्यांत High Alert

Latest Weather Forecast: उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार (Heavy rainfall) आहे.

Latest Weather Forecast: उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार (Heavy rainfall) आहे.

Latest Weather Forecast: उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार (Heavy rainfall) आहे.

मुंबई, 08 जानेवारी: मागील काही दिवसांत मुंबईसह (Mumbai weather) राज्यातील हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार (heavy rainfall with thunderstorm) पाऊस कोसळणार आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची (hailstorm alert in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बंन्सचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे वायव्य भारत आणि लगतच्या मध्य भारतात अरबी समुद्रातून उच्च आर्द्रता पुरवठा होणार आहे. पुढील 2 दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे. परिणामी पुढील 3 ते 4 दिवसांत मध्य भारतावर; अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पाउस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-आधी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना ओमिक्रॉनची लागण होऊ शकते का? WHOने दिलं उत्तर

गेल्याच आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या अस्मानी संकटातून राज्यातील शेतकरी अद्याप सावरला नाही. तोपर्यंत राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे.

हवामान खात्याने आज नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येथेही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर 10 ते 12 जानेवारीदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपून काढणार आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Nagpur, Weather forecast, महाराष्ट्र