मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Weather Alert: गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

Weather Alert: गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather in Maharashtra: गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात (heavy rainfall alert in maharashtra) आला आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर: बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) काल रात्री उशीरा दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला येऊन धडकलं आहे. पण आज पहाटे वाऱ्याच्या वेग कमी झाल्याने या वादळाचं रुपांतर पुन्हा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात (heavy rainfall alert in maharashtra) आला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या कोकणातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपुराला रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासात संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर उद्या आणि परवा कोकण आणइ मध्य महराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि जळगाव हा सात जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि नंदुरबार याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हेही वाचा-चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस राज्यातील हवामान झपाट्याने बदल घडत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस पर्यटकांनी किंवा मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र