Weather Forecast: कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 24 तास महत्त्वाचे, मुंबईसह पुण्यालाही इशारा
Weather Forecast: कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 24 तास महत्त्वाचे, मुंबईसह पुण्यालाही इशारा
आज हवामान खात्यानं एकूण पंधरा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
Weather Forecast: आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पण पुढील चोवीस तासांत कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, 08 सप्टेबर: गेल्या आठवड्यापासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी (heavy to very heavy rainfall) लावली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणं भरली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यानंतर आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पण पुढील चोवीस तासांत कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (rainfall in konkan) इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज हवामान खात्यानं एकूण पंधरा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर या जिल्ह्याला रेड अलर्ट (Red alert) जारी केला असून याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. याठिकाणी येत्या काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा-Corona Update: भारतात पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक लसीकरण, 24 तासांत नवा विक्रम
दुसरीकडे, मुंबईसह पुणे, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव औरंगाबाद आणि जालना या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा आणि आकाशात विजा चमकत असताना, मोठ्या झाडाखाली थांबू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
8 Sept, राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी, IMD ने मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारे आज दिले आहेत. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ओरेंज इशारे;मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक पुणे इ. सहीत
उद्या पासून तीव्रता कमी.
📢📢 परत 4,5 दिवसा पासून कोकणात इशारे दिले आहेत pic.twitter.com/PDgWX15z1g
हेही वाचा-महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईतल्या तिसऱ्या लाटेबद्दल महत्त्वाचं विधान
दुसरीकडे, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण कोकणात मात्र उद्याही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण आठवड्याचा शेवटी शनिवार आणि रविवारी दक्षिण कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवसांसाठी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.