• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आज 22 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट

Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आज 22 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट

Weather Update: आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 17 ऑक्टोबर: सध्या बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात  (Arabian sea) दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झालं (Low pressure area) आहे. दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा  मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात दोन ते तीन दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस कोसळला आहे. यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे. हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. अकोल्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy rainfall in maharashtra) झाली आहे. हेही वाचा-हिवाळ्यात किती धोकादायक ठरू शकतो कोरोनाव्हायरस? खरंतर, दरवर्षी 17 ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परततो. 6 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर, दरम्यान अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र आणि ईशान्यकडील काही राज्यात अडकला आहे. त्यामुळे राज्यातील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हेही वाचा- पुढील 48 तास महत्त्वाचे! मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तर पहाटे हवामानात किंचितसा गारवा जाणवत आहे. काल महाबळेश्वरमध्ये 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर  सातारा (18.7), नाशिक (16.3), सोलापूर (18.6), औरंगाबाद (18.4), पुणे (18.4) आणि बारामती 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: