मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update: राज्यावरील अस्मानी संकट आणखी गडद; 3 दिवस बरसणार सरी, 14 जिल्ह्यांत हाय अलर्ट

Weather Update: राज्यावरील अस्मानी संकट आणखी गडद; 3 दिवस बरसणार सरी, 14 जिल्ह्यांत हाय अलर्ट

Weather Update: हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy rainfall) अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई पुण्यासह 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow) जारी केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर: गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा सुरू आहे. आठवडाभर ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy rainfall) अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई पुण्यासह 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow) जारी केला आहे.

खरंतर, सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने आज मुंबई, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त आज जळगाव, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-मुंबईत Omicron Variant चं अस्तित्त्व?, लवकरच येणार रिपोर्ट

उद्यापासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र