सावधान! मुंबई, ठाणे आणि कोकणात आजही  मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याने दिला इशारा

सावधान! मुंबई, ठाणे आणि कोकणात आजही  मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याने दिला इशारा

दररोज हजारापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यातच आता पाऊस सुरू असल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे.

  • Share this:

मुंबई 6 जुलै: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारीही (6 जुलै) मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. IMD, GFS व WRF मॉडेल मार्गदर्शनानुसार 6 जुलैसाठी मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणीही साचलं होतं. त्यामुळे ट्राफिकची समस्याही निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने मुंबईत हाहाकार उडाला आहे. दररोज हजारापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यातच आता पाऊस सुरू असल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे.

त्यामुळे काळजी घेण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. शक्य असेल तर घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असं आवाहन सरकारने केलं आहे.

गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागलांय. पवई तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही. मुंबईतील उद्योगीक वापरासाठीच पवई तलावाचं पाणी वापरलं जातं.

राज्यात आजही उच्चांकी  6555 कोरोना रुग्णांची वाढ, मृत्यूचा आकडा गेला 8822 वर

यावर्षीही हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सध्या मुंबईत लोकल सेवा मर्यादीत प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यावर्षी लोकस सेवा बंद पडण्याचा तसा धोका नाही.

मात्र महापालिका प्रशासनाला जास्त सतर्क राहावं लागणार असून साथीच्या आजारांपासून लोकांना कसं वाचवायचं हा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 6, 2020, 7:19 AM IST

ताज्या बातम्या