महा चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

महा चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

मुंबईसह राज्यात पुढील 48 तास पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी राहणार ढगाळ वातावरण.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर: (MAHA )महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अचानक मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरू झाला. विशेषत: सातांक्रूज, चेंबूर, बोरिवली, मालाड परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. तर गुरुवारी रात्रीपासून उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरात ढगाळ वातावरण आणि काही भागांत पाऊस राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे. मुसधळार पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल वाहतूक 20 ते 30 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर महाचक्रीवादळामुळे राज्यभरात पावसाचं सावट असणार आहे. काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात परतीच्या पावसाने व क्यार वादळाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळं भात शेतीचे झालेल्या नुकसान भरपाई चे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. जळगावमध्ये गुरुवारी रात्री पाचोरा, जळगाव परिसरात तासभर पाऊस झाला. सध्या तिथे ढगाळ वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यात काल पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळं शेतक-यांच्या पिकांना पुन्हा मोठा फटका बसला आहे. मिरची पिकाचं पावसामुळे मोठं नुकसान होणार आहे.

महाचक्रीवादळा पाठोपाठ आता आणखी एक वादळ घोंगावत येणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Bulbul Alert : सावधान...हे भीषण चक्रीवादळ 6 तासांत धडकणार, NDRF अलर्टवर

एका पाठोपाठ एक असे तीन चक्रीवादळं धडकण्याची ही पहिलीच वेळ असून या आधी क्यार आणि महा ही वादळ धडकली होती.क्यार आणि महा या चक्रिवादळानंतर आता 'बुलबुल' हे दुसरं वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने त्याचा अलर्ट दिला असून NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अलर्टची दखल घेतली असून पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांशी तयारीबाबत चर्चा केलीय.दक्षिण भारतात 'महा' या चक्रिवादळाचा धोका आता कमी झालाय. हा धोका कमी होत असतानाच हे नवीन वादळ धडकणार असून त्याला शास्त्रज्ज्ञांनी बुवबुल हे नाव दिलंय.एका पाठोपाठ एक असे तीन चक्रिवादळं धडकण्याची ही पहिलीच वेळ असून या आधी क्यार आणि महा ही वादळ धडकली होती.

VIDEO: ...तर राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या