• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Weather Alert: पुढील 5 दिवस मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Alert: पुढील 5 दिवस मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Alert: राज्यात आज एकूण नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन तासांत मुंबईसह तीन जिल्ह्यांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जुलै: मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. काल रात्रभर धुव्वाधार पाऊस झाल्यानं मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचलं आहे. आजही मुंबईकरांना पावसानं उसंत दिली नाही. आज मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. त्यामुळे आज राज्यातील नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, ठाणे, पालघर आणि सातारा या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. हेही वाचा-घरपोच लसीकरणाला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्यांसाठी विशेष सुविधा, अशी करा नोंदणी मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आज सकाळपासूनच अरबी समुद्रातील काही भागासह मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत आकाशात ढगांची मोठ्या प्रमाणात दाटी नोंदली गेली आहे. तर पुणे परिसरातही आज दुपारपासून जोरदार पावसाचे ढग जमत आहेत. याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी नभ भरून आलं आहे. त्यामुळे आज राज्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-लशींचे दोन्ही डोस घेऊनही होतेय कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं कारण पुढील पाच दिवस मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस मागील तीन दिवसांपासून मुंबईला पावसानं चागलंचं झोडपून काढलं आहे. यानंतर आता मुंबईसह पुण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील आणखी पाच दिवस मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार नाही.
  Published by:News18 Desk
  First published: