रत्नागिरी, 28 जून : राज्यात मान्सूनला जोरदार
(Monsoon Update) सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर
(Konkan monsoon update) मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे. अशातच आता हवामान खात्याने
(IMD) आणखी एक इशारा दिला आहे.
हवामान खात्याने काय म्हटलं -
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 29 जून 2022 ते 01 जुलै 2022 या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन -
कोकणात होणाऱ्या या पावसामुळे मच्छिमारांनी सदर कालावधीत समुद्रात जावू नये. 28 जून ते 02 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? मंत्र्याच्या संशयामुळे खळबळ
मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मुंबई, ठाणे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील पुढील 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.